-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील जय-शर्वरीच्या केमिस्ट्रीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. अल्पावधीतच या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. पण, जयची भूमिका साकारणाऱ्या राजच्या खऱ्या बायकोला तुम्ही पाहिलंत का?
-
‘सनई चौघडे’ मालिकेत जय खानोलकर ही भूमिका अभिनेता राज हंचनाळे साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात २०१९ मध्ये अभिनेता लग्नबंधनात अडकला.
-
राजने २०१९ मध्ये मनिषा म्हणजे मॉली डेस्वालशी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लव्हमॅरेज असून, लग्नाआधी सहा वर्षे हे दोघंही एकमेकांना ओळखत होते.
-
राज हंचनाळे मराठी कलाविश्वात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. तर, मॉली ही हरियाणाची आहे. दोघंही एकमेकांना २०१३ पासून ओळखत होते.
-
राज आणि मॉली दोघंही सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतात. मॉलीचा वाढदिवस नुकताच पार पडला यानिमित्ताने राजने खास पोस्ट लिहित आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
मॉली ही स्केच आर्टिस्ट आहे. तिने काढलेली सुंदर चित्रे व स्केच ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
राज हंचनाळे कोल्हापूरचा असून मॉली ही हरियाणाची आहे त्यामुळे चाहते या दोघांकडे पाहून 2 States लव्हस्टोरी असंही म्हणतात.
-
मॉलीच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत राजने लिहिलं होतं, “माझी पर्सनल असिस्टंट, माझी मॅनेजर, माझी पापराझी, माझी एडिटर, माय गूगल, माझी सतत फिरकी घेणारी व्यक्ती, २४ तास माझ्याबरोबर असणारी माझी स्टँडअप कॉमेडियन, माझी आहारतज्ज्ञ, माझी सगळ्यात मोठी चाहती, माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि महत्त्वाचं म्हणजे माझी पत्नी…तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”
-
राज आणि मॉलीच्या फोटोंवर चाहते कायमच लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : Manisha Deswal/ raj hanchanale इन्स्टाग्राम )
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!