-
शर्मिष्ठा राऊत-देसाई (Sharmishtha Raut Desai) ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती आहे.
-
शर्मिष्ठाने नुकतीच ‘एस्सेल ग्रुप’च्या (Essel Group) १०० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यातील शर्मिष्ठाच्या मराठमोळ्या लूकने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
शर्मिष्ठाने निळ्या रंगाची सुरेख खणाची साडी नेसली असून, त्यावर जास्वंदीच्या फुलांची एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
-
या खणाच्या साडीवर शर्मिष्ठाने मोत्यांचे पारंपरिक दागिने परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना शर्मिष्ठाने ‘Maharashtrian Elegance Is Timeless’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शर्मिष्ठा सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ (Suna Yeti Ghara TV Serial) या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्मिष्ठा राऊत/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ