-
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus TV Serial) मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
वैष्णवीने नुकतेच दाक्षिणात्य अंदाजात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने सुरेख हिरव्या रंगाचा सिल्क साडीचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
या दाक्षिणात्य लूकला साजेसा असा पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांचा साजही वैष्णवीने केला आहे.
-
या सुंदर फोटोंना शेअर करत वैष्णवीने “South Indian Soul” असे कॅप्शन दिले आहे.
-
वैष्णवीच्या या रूपावर पती किरण गायकवाडसह (Kiran Gaikwad) चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच वैष्णवीचा ‘घबाड-कुंड’ (Ghabadkund Movie) हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ