-
Shravan 2026: श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो.
-
या महिन्यात पाळल्या जाणाऱ्या सोमवारी व्रताला ‘श्रावणी सोमवार’ (Shravani Somvar) म्हणतात.
-
याच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने खास निळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील या लूकवर जुईने हलका मेकअप, आकर्षक हेअरस्टाईल आणि पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
हे फोटोशूट शेअर करताना जुई म्हणाली, “आला श्रावण मास, सखी आली दारी, नऊवारी साडी अन् गळ्यात ठुशी भारी। हिरव्या सुवासाच्या लेवूनिया बांगड्या, खेळूया फुगडी अन् गोल गोल पांगड्या। पाटावर बसली माझी मंगळागौर सुंदर, फुलांच्या हारीने सजले हे मंदिर।”
-
“दीप ओवाळूनी सुवासिनी गाती गाणी, सौभाग्याचं लेणं जशी प्रेमाची लावणी। झिम्मा आणि फुगडीचा ताल हा धरू, आनंदाने आज गौरी पूजन करू।”
-
“अखंड सौभाग्य देवो हीच माउली, सखींच्या सहवासाने न्हाली ही सावली।”
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
दातांतील कीड पडेल ५ मिनिटांत बाहेर; फक्त चावून खा स्वयंपाकघरातील ‘हे’ २ पदार्थ; पिवळे-काळे दात होतील मोत्यांसारखे चमकदार!