-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ (Anandi TV Serial) या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकर (Jaaee Khandekar) ‘आनंदी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
मालिकेतील ‘आनंदी’ला डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी ती मनाने आणि संवेदनांनी हे जग पूर्णपणे अनुभवते.
-
जाईसाठी ही भूमिका एक नवा आणि अत्यंत आव्हानात्मक अनुभव आहे.
-
जाईने नुकतंच समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी जाईने गुलाबी रंगाची बनारसी साडी आणि त्याला साजेसे सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
जाईने आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा तिन्ही क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जाई खांडेकर/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला