-
Shravan 2026: श्रावण महिन्याची सुरुवात होताच अवघा परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
-
विशेष म्हणजे, यंदा श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आला आहे.
-
या खास औचित्यावर मराठी अभिनेत्री माधवी निमकरने (Maadhavi Nemkar) केलेल्या एका विशेष फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधवीने जांभळ्या रंगाची आकर्षक डिझायनर नऊवारी साडी आणि त्यावर उठून दिसणारा केशरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या पारंपरिक नऊवारी लूकवर माधवीने साजेशा पारंपरिक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे.
-
उत्कृष्ट मेकअप आणि खास हेअरस्टाईलमुळे माधवीचा हा श्रावण लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
माधवी सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tujhya Sobatine TV Serial) या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
४ दिवसांनी ‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी! बुधाच्या उदयाने सुरू होणार अच्छे दिन, धनसंपत्ती अन् सोन्याने भरेल तिजोरी