-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि खास स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
श्रुती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिचे नवनवीन सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
या फोटोंमध्ये श्रुतीने सुंदर हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यावर सोन्यासारखे चमकदार नक्षीकाम केलेले दिसते. या साडीसोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातला असून त्यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे.
-
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून साडीतील काही खास फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
साडीला साजेसा असा हिरव्या आणि गोल्डन रंगाचा डायमंड नेकलेस तिने गळ्यात परिधान केला आहे. गळ्यातील दागिन्यांशी जुळणारे मोठे आणि आकर्षक कर्णफुले घालून तिने आपल्या या लूकची शोभा वाढवली आहे.
-
मोकळे केस, हलका आणि नैसर्गिक मेकअप तसेच कपाळावर छोटीशी गुलाबी टिकली लावून तिने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी जोडली असून, तिच्या या दिलखेचक लूकने आणि नजाकतीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
तिच्या या मोहक लूकवर चाहते आणि नेटकरी मनापासून फिदा झाले असून फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत