-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लाडकी आणि गुणी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या शिवानीने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे, गुलाबी फुलांची नाजूक प्रिंट असलेले अतिशय आरामदायी नाईटवेअर परिधान केले आहे.
-
एका फोटोत ती खिडकीजवळ उभी राहून अंगावर येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीचा आणि पावसाच्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोंमध्ये ती लाकडी खांबाला धरून कॅमेऱ्याकडे पाहून अत्यंत सुंदर आणि गोड हास्य देताना पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंना तिने ‘You know it’s a good morning when it’s raining outside and you have nowhere to be!’ अशी सुरेख कॅप्शन दिली आहे.
-
शिवानीच्या या साध्या, घरगुती आणि मनमोहक लूकने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांना तिचा हा शांत अंदाज मनापासून आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ