-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रूपाली भोसले मंगळागौरीच्या सणासाठी केलेल्या विशेष आणि सुरेख लूकसहित पाहायला मिळत आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने परिधान केलेली पेस्टल आकाशी रंगाची हेवी बॉर्डर साडी तिच्या सौंदर्याला विशेष शाइन देत आहे.
-
साडीला साजेसे भरतकाम असलेला ब्लाऊज आणि गळ्यात घातलेला आकर्षक चोकर हार तिच्या लूकला राजेशाही स्पर्श देतो.
-
नाकातील नथ, हातात पारंपरिक बांगड्या आणि केसात माळलेला फुलांचा गजरा तिच्या या मराठमोळ्या लूकला पूर्णत्व देत आहे.
-
या खास फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले आहे की, ‘साडी म्हणजे फक्त एक वस्त्र नाही, तर ती आपली परंपरा, सौंदर्य आणि अभिमानाचे रूप आहे.’
-
निसर्गरम्य वातावरणात दगडी पायऱ्यांवर उभे राहून दिलेली तिची पोझ आणि हातात धरलेली नाजूक कमळाची फुले चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
सोशल मीडियावर फोटो पोस्ट होताच चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला असून तिचा हा लूक प्रचंड पसंत केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला