-
स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ (Aamchya Ladkya Naik Bai TV Serial) ही नवी मालिका १० ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ‘शारदा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.
-
या मालिकेची कथा अलिबागमधील एका छोट्याशा गावात घडते.
-
या भूमिकेसाठी ऐश्वर्या यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या अभिनयाप्रती असलेलं समर्पण अधोरेखित करते.
-
शारदाचा संघर्ष, तिचे धैर्य आणि तिच्या स्वप्नांचा प्रवास यामध्ये अनेक महिलांना स्वतःचे प्रतिबिंब दिसेल; म्हणूनच ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका प्रत्येक घराशी भावनिक नातं जोडेल, यात शंका नाही.
-
ऐश्वर्या यांनी नुकतेच सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्यांनी केशरी रंगाची आकर्षक साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे, ज्यामध्ये त्या खूपच खुलून दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
‘CJP आंदोलकाला नोटीस पाठवायची तुमची हिंमत कशी झाली?’ सरन्यायाधीश सूर्य कांत का संतापले?