-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही कौटुंबिक मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ही ‘ऐश्वर्या’ ही व्यक्तिरेखा अतिशय उत्तम प्रकारे साकारत आहे.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रतीक्षाने नुकताच मंगळागौरीसाठी एक खास पारंपरिक लूक केला आहे.
-
या लूकसाठी तिने जांभळ्या व गुलाबी रंगाची, सोनेरी काठ आणि बुट्टी असलेली सुंदर पैठणी साडी नेसली आहे.
-
साडीवर तिने गुलाबी रंगाचा आरी वर्क आणि बारीक नक्षीकाम असलेला कोपर्यापर्यंतच्या बाह्यांचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
कानात नाजूक झुमके, नाकात मोत्याची नथ आणि हातांत हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत सोनेरी तोडे तिने घातले आहेत.
-
केसांचा नीटनेटका अंबाडा रचून आणि कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावून तिने आपला हा सणउत्सवाचा लूक पूर्ण केला आहे.
-
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना प्रतीक्षाने ‘कुंजवनाची सुंदर राणी…’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रतीक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी