-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या उत्तम अभिनयासोबतच सौंदर्य आणि स्टाईलसाठी ओळखली जाते.
-
अनेक नाटकं, चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रिया तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भुरळ पाडत असते.
-
सध्या प्रिया बापट तिच्या आगामी ‘हे काय नवीन? २’ या नवीन नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहे. याच प्रियाने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियाने नेसलेली गडद लाल/मरून रंगाची आणि त्यावर सोनेरी काठ असलेली पारंपरिक साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
प्रियाने या मराठमोळ्या लुकवर गळ्यात सुंदर मोत्यांचा व खड्यांचा चोकर हार, कानात मॅचिंग झुमके आणि हातात नाजूक बांगड्या असा पारंपरिक दागदागिन्यांचा साज केला आहे.
-
केसांमध्ये माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि कपाळावर छोटीशी टिकली यामुळे तिचा हा लूक अत्यंत मोहक आणि सात्विक दिसत आहे.
-
प्रियाने हे फोटो शेअर करताना ‘I just need an occasion to dress up… Me in my मराठमोळा साज’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
प्रियाच्या या नितांत सुंदर मराठमोळ्या अवतारावर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंची बदलीसंदर्भातील पोस्ट चर्चेत; MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच म्हणाले, “माझी एफडीएमधून…”