-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ (Suna Yeti Ghara TV Serial) या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दीपा चौधरी (Deepa Chaudhari) मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
दीपाने नुकतीच एका विशेष मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यासाठी दीपाने केशरी रंगाची आकर्षक नऊवारी पैठणी साडी नेसली होती.
-
दीपाने केदार शिंदे दिग्दर्शित प्रसिद्ध ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhari Deva Movie) या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
हे खास फोटो शेअर करताना दीपा म्हणाली, “‘बाई पण भारी देवा’ चित्रपटानंतर माझ्या आयुष्यात मंगळागौर आणि त्यातील पारंपरिक खेळांचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे.”
-
“या कार्यक्रमात खूप मजा आली अन् जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. इथे अनेक नवीन मैत्रिणी भेटल्या, पण सोहळ्यात ‘काकडे सिस्टर्स’ची उणीव भासली आणि त्यांची खूप आठवण आली!”
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द