-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) धाकटा भाऊ अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) नुकताच विवाहबंधनात अडकला. हा सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
-
‘करवली Duties’ असे कॅप्शन देत सोनालीने अतुलच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनाली तिचा पती कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नातील सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाली होती.
-
या विवाहसोहळ्यात सोनालीने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या सुंदर बनारसी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
मेहंदी, संगीत आणि मुख्य विवाह सोहळा अशा सर्व कार्यक्रमांना जवळचे नातेवाईक आणि मित्र-परिवार उपस्थित होते.
-
या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली होती.
-
अतुल कुलकर्णी हा एक उत्तम डान्सर, मॉडेल आणि इव्हेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
-
अतुलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या नवविवाहित दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”