-
महाराष्ट्रातील घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) आणि ‘सोनी मराठी’ वाहिनीने आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
या खास औचित साधून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येत या आनंदाचा सोहळा साजरा केला.
-
गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाने केवळ एक विनोदी शो म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.
-
वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफाट केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगांचे खुसखुशीत सादरीकरण यांमुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने उदंड प्रतिसाद मिळत आला आहे.
-
आठ वर्षांच्या या प्रवासात या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना घराघरात पोहोचवले.
-
आज या मालिकेतील पात्रे आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्याचा भाग बनले आहेत.
-
सोशल मीडियावर स्किट्सची होणारी चर्चा, कलाकारांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक नव्या भागाबद्दलची उत्सुकता ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या अफाट लोकप्रियतेची साक्ष देते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”