-
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गेली आठ वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे.
-
दर्जेदार विनोद, कलाकारांची अफलातून सादरीकरणे आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ यामुळे हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे.
-
याच कार्यक्रमातून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
-
नुकतेच शिवालीने सोशल मीडियावर तिच्या या कार्यक्रमातील नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना शिवालीने ‘Say Hi To Jimin परब’ असे भन्नाट कॅप्शन दिले आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या यशस्वी आठ वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येत केक कापून हा आनंदाचा क्षण साजरा केला.
-
१,००० हून अधिक भाग आणि ३,००० हून अधिक भन्नाट स्किट्स सादर करत या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात हक्काचे आणि अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”