-
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
लालबाग-परळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही गोष्ट प्रेक्षकांना खूप भावत आहे.
-
मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भावनिक जोडणीमुळे या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) आणि अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.
-
चिन्मयी या मालिकेत ‘शर्वरी परब’ (शरू) ही बिनधास्त आणि बेधडक मुलगी साकारत आहे.
-
चिन्मयीने नुकतेच सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सध्या मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिन्मयी साळवी/इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts