-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) सध्या तिच्या आगामी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ (Mirzapur The Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात श्रिया पुन्हा एकदा तिची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘स्वीटी गुप्ता’ ही भूमिका साकारणार आहे.
-
वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये स्वीटीच्या पात्राचा मृत्यू दाखवला गेला होता.
-
मात्र, हा चित्रपट २०१८ च्या पहिल्या सीझनच्या काळातील एक समांतर कथा मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रियाने परिधान केलेल्या गडद हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या चित्रपटात पंकज त्रिपाठी (कालीन भैया), अली फजल (गुड्डू पंडित) आणि दिव्येंदू शर्मा (मुन्ना भैया) यांच्यासोबत जितेंद्र कुमार आणि रवी किशन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी