-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ मिथुन राशीत विराजमान आहे.
-
पंचांगानुसार, मंगळ १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत याच राशीत विराजमान असेल. मंगळाचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
मेष राशीसाठी मंगळाचे गोचर उत्साह, आत्मविश्वास आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता वाढवणारे ठरू शकते. या काळात रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
-
मंगळाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
-
मंगळाचे राशी परिवर्तन प्रवेश मकर राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड! मूल्यांकनात गडबड; १३५ गुणांचे झाले १०१ आणि नंतर ६८…