-
Prajakta Mali Lalit Prabhakar Shubh Mangalam Jodi Dangalam Movie: जवळपास १३ वर्षांनंतर मराठी प्रेक्षकांची आवडती जोडी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर पुन्हा एकदा ऑन-स्क्रीन एकत्र येत आहे.
-
प्राजक्ता आणि ललित लवकरच ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
-
या चित्रपटाच्या नावावरूनच हा एक कौटुंबिक आणि धमाकेदार रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असेल असा अंदाज बांधला जात आहे.
-
याच चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता आणि ललितने एक खास रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
या लूकसाठी प्राजक्ताने आकर्षक गुलाबी रंगाचा ड्रेस, तर ललितने मरून रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट परिधान केली आहे.
-
यापूर्वी झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील ‘मेघना आणि आदित्य’च्या भूमिकेतून या जोडीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते.
-
त्यांची ही सुपरहिट केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”