-
क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहे.
-
क्रांतीने ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘गंगाजल’ (हिंदी) यांसारख्या चित्रपटांतील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली, तर ‘काकण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनातही आपली छाप पाडली.
-
नुकतेच क्रांतीने तिच्या कुटुंबाबरोबर एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये क्रांतीचे पती, केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या झायदा (Zayda) व झिया (Ziya) या जुळ्या मुली पाहायला मिळत आहेत.
-
या फोटोला क्रांतीने ‘My World’ (माझं जग) असे प्रेमळ कॅप्शन दिले आहे.
-
क्रांतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी “सुंदर कुटुंब”, “खूप छान”, आणि “भरपूर प्रेम” अशा अनेक सकारात्मक कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
क्रांती नेहमीच सोशल मीडियावरील तिचे व्हिडिओ, कौटुंबिक किस्से आणि मुलींच्या संगोपनाचे मजेशीर अनुभव यामुळे चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!