-
मराठी चित्रपट व मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने नुकतीच तिच्या घरी अत्यंत भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती.
-
धार्मिक व कौटुंबिक सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
पूजेच्या वेळी अभिज्ञा भावे हिने नेसलेली आकाशी रंगाची पारंपरिक साडी, गळ्यात शोभणारा नाजूक दागिना आणि चेहऱ्यावरील हसू तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होते.
-
फोटोंमध्ये अभिज्ञा आणि तिचा पती दोघेही पूजेच्या वातावरणात अतिशय प्रसन्न व पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
घरातील पूजेची चौरंग सजावट, केळीचे खांब, फुलांची सुंदर आरास आणि सत्यनारायणाचा प्रसाद सर्व काही अगदी नीटनेटके व पारंपरिक पद्धतीने सजवले गेले होते.
-
या पूजेप्रसंगी कुटुंबातील सर्व महिला सदस्य एकत्रित आल्या असून त्यांनी खास कौटुंबिक क्षणांचा आनंद लुटत फोटोसेशन केले.
-
सोशल मीडियावर हे खास फोटो शेअर करत अभिज्ञाने ‘A Simple सत्यनारायण’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सध्या अभिज्ञा भावे ही ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’मध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
समोर गोड बोलणारा व्यक्ती तुम्हाला फसवतेय हे ओळखायचं कसं? चाणक्यांनी सांगितले ‘हे’ ५ संकेत