-
लोकप्रिय अभिनेत्री व यशस्वी निर्माती श्वेता शिंदे हिने आपल्या उत्तम मालिकांच्या निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या श्वेताने नुकतेच आपले काही अत्यंत सुंदर फोटो शेअर करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिने परिधान केलेली गुलाबी आणि नारिंगी रंगाच्या शेड्सची रेशमी पैठणी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
साडीचा काठ आणि पदरावरील सोनेरी नक्षीकाम तिच्या या पारंपरिक रूपाला एक वेगळीच भव्यता प्रदान करत आहे.
-
या लूकला साजेसे असे बारीक नक्षीकाम असलेला मोत्यांचा चोकर हार, मॅचिंग झुमके आणि हातात घातलेली सुटसुटीत गोटा-बांगडी तिचे सौंदर्य अधिक अधोरेखित करते.
-
केसांचा बांधलेला सुंदर अंबाडा, त्यावर माळलेला गजरा आणि कपाळावरील नाजूक लाल टिकली तिच्या मराठमोळ्या लूकची शोभा वाढवत आहे.
-
या नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट करताना तिने ‘Shades of sunset, draped to perfection’, अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
श्वेताच्या या सोज्वळ आणि पारंपरिक लूकवर तिचे चाहते घायाळ झाले असून सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
अवघ्या १० मिनिटांत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले; सेन्सेक्स ९०० अंशांनी कोसळला, घसरणीची ५ मुख्य कारणे