-
सन मराठी वाहिनीवरील तू अनोळखी तरी सोबती ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत आहे.
-
मालिकेत अर्पिता हे मुख्य पात्र साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण आपल्या उत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचली आहे.
-
मंगळागौरीच्या निमित्ताने योगिताने नुकतेच एक खास पारंपरिक फोटोशूट केले असून, तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
योगिताने या खास फोटोशूटसाठी गुलाबी रंगाची भरजरी नऊवारी पैठणी साडी नेसली असून, त्यावर सोनेरी काठ आणि बुट्टे उठून दिसत आहेत.
-
तिच्या साडीवर तिने परिधान केलेला जांभळ्या रंगाचा ब्लाऊज आणि त्यावरील सुंदर डिझायनिंग वर्क तिच्या या संपूर्ण लूकला अधिकच भव्य बनवत आहे.
-
दागिन्यांमध्ये तिने गळ्यात मोत्यांचा तन्मणी, मोत्यांची माळ आणि कानांत पारंपरिक झुमके, तसेच वेल परिधान केले आहेत.
-
तिने डोक्यावर पारंपरिक पद्धतीने अंबाडा बांधून, त्यावर पिवळ्या ताज्या फुलांचा गजरा माळला आहे, जो तिच्या लूकला एक नैसर्गिक ताजेपणा देतो.
-
नाकात सुरेख मोत्याची नथ, कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि चेहऱ्यावरील हास्य यांमुळे तिचा हा मंगळागौरीचा लूक अत्यंत आकर्षक वाटत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम) (हेही पहा: युगेंद्र पवार यांनी सपत्नीक घेतले बारामतीतील श्री मयूरेश्वराचे दर्शन; तनिष्का यांचा पारंपरिक अंदाज चर्चेत!)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts