-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून रेश्माने प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच रेश्माने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि अत्यंत मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्मा पांढरा व सोनेरी काठ असलेल्या केरळ पद्धतीच्या साडीमध्ये अतिशय सुंदर व शांत वाटत आहे.
-
या पांढऱ्या साडीवर तिने परिधान केलेला सोनेरी रंगाचा डिझायनर ब्लाऊज तिच्या या लूकला अधिक आकर्षक बनवतो.
-
तिने केसांची वेणी घालून, त्यात माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि कानातील झुमके तिच्या सौंदर्याचे तेज अधिक वाढवीत आहेत.
-
शांत जलप्रवाहात बोटीमध्ये बसून निसर्गाच्या सान्निध्यात केलेले हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
आपले हे सुंदर फोटो शेअर करताना रेश्माने त्यांना ‘In my happy era’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
फोटोंमधील तिचे हे गोड स्मित आणि शांत लूक पाहून, चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेशमा शिंदे/इन्स्टाग्राम) (हेही पहा: गुलाबी नऊवारी साडी अन् मोत्यांचे दागिने; मंगळागौरीनिमित्त योगिता चव्हाणचा पारंपरिक लूक)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ