-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ या मालिकेतील उमा या मुख्य भूमिकेतून अभिनेत्री दीपा चौधरी घराघरांत पोहोचली आहे.
-
तिच्या या सोज्वळ आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून तिच्या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
दरम्यान, स्टार प्रवाहचा बहुचर्चित आणि लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
हा बहुप्रतीक्षित आणि संगीतमय कार्यक्रम येत्या २९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
-
याच कार्यक्रमाच्या सेटवर दीपा चौधरीने हजेरी लावली असून तेथील काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपाने अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
-
गळ्यात रंगीबेरंगी फुलांची माळ आणि कंबरेला एम्ब्रॉयडरी बेल्ट परिधान करून तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे.
-
दीपाने या फोटोंना ‘Pure ocean vibes…’ अशी सुंदर आणि आकर्षक कॅप्शन दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य: दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
दशदिशांनी लक्ष्मी धावून येणार! ३० वर्षांनतर शनी महाराज होणार मार्गी, २०२७पर्यंत ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; बँक बॅलन्स वाढणार कोटींमध्ये