-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या अर्थात अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर हिने नारळी पौर्णिमेनिमित्त खास लूक शेअर केला आहे.
-
नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण असून, तो उत्साहाने साजरा केला जातो.
-
प्रतीक्षा मुणगेकर हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक आणि सणासुदीनिमित्त केलेला लूक लक्ष वेधून घेणारा आहे.
-
या खास प्रसंगासाठी तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे, ज्यावर कमळ आणि गाईची सुंदर चित्रे आहेत.
-
पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज, असा विरोधाभासी लूक तिला खूपच शोभून दिसत आहे.
-
प्रतीक्षाने दागिन्यांमध्ये झुमके आणि कड्यांची निवड केली आहे, जे तिच्या रूपाला अधिकच खुलवत आहेत.
-
तिचा हा मनमोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रतीक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts