-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आपली लग्नानंतरची पहिली मंगळागौर अतिशय उत्साहात साजरी केली आहे.
-
लग्नानंतर पती तनुज गोवळकरबरोबर अमेरिकेला फिरायला गेलेल्या अपूर्वाने परदेशातही आपली संस्कृती आणि परंपरा जपत मंगळागौरीचे व्रत केले.
-
या खास दिवशी अपूर्वाने लाल आणि पिवळ्या रंगाच्या रेशमी नऊवारी साडीत अत्यंत आकर्षक व सुंदर रूप परिधान केले होते.
-
पारंपारिक दागिन्यांसह नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि केसांत गजरा माळलेला अपूर्वाचा सोज्वळ लूक फोटोमध्ये खुलून दिसत आहे.
-
केसांचा आंबाडा बांधून त्यावर पांढऱ्या-लाल फुलांचा गजरा माळल्याने तिचा सोज्वळ अवतार अधिकच खुलून दिसत होता.
-
परदेशात असूनही भारतीय परंपरा जपण्याचा अपूर्वाचा हा प्रयत्न तिच्या चाहत्यांना खूप भावला आहे आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
‘My first मंगळागौर… and that too in the US, California!’ अशा कॅप्शनसह तिने सोशल मीडियावर या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
अपूर्वाने परदेशात साजरी केलेली ही मंगळागौर तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच खूप खास आहे. (सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
MPSC: एसआयटी चौकशीत त्या अध्यक्षासह काही अधिकाऱ्यांवर संशयाची सुई, पुढे आयोगात काय घडणार बघा…