-
तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री असण्याबरोबरच एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
-
तितीक्षाने तिची सहकलाकार ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) यांच्यासह एकत्र येत साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
-
‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ (Thread & Thumka By Tasvi) असे त्यांच्या ब्रँडचे नाव असून, त्यांनी नुकताच स्वतःचा बुटिक स्टुडिओ सुरू केला आहे.
-
‘Tasvi’ या नावाचा अर्थ: तिन्ही अभिनेत्रींच्या नावांच्या आद्याक्षरांवरून (Titeeksha, Aishwarya, Suruchi आणि VI – ‘तस्वी’) हे नाव साकारण्यात आले आहे.
-
या ब्रँडच्या ऑनलाइन स्टोअर आणि सोशल मीडिया पेजवर प्रामुख्याने विविध प्रकारच्या पारंपरिक साड्यांचे अप्रतिम कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
-
नुकतीच या बुटिक स्टुडिओमध्ये श्रावण महिन्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
-
या पूजेसाठी तितीक्षाने नेसलेल्या निळ्या रंगाच्या साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
२२ ऑगस्ट रोजी ‘थ्रेड अँड ठुमका’ या ब्रँडला १ वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ