-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पाठराखीण’ (Paathrakhin TV Serial) ही नवीन मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गौरी इंगवले (Gauri Ingawale) ‘भाग्यश्री’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि वेदनेत एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या दोन बहिणींची.
-
बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.
-
गौरीने नुकतीच एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी गौरीने गडद जांभळ्या रंगाची सुरेख नऊवारी साडी परिधान केली होती.
-
जांभळ्या नऊवारी साडीबरोबर गौरीने केलेला पारंपरिक दागिन्यांचा साज खूपच सुंदर दिसत होता.
-
‘पाठराखीण’ या मालिकेची निर्मिती सोहम आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रॉडक्शन’ने केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी इंगवले/इन्स्टाग्राम)
वारंवार गोष्टी विसरता? मग मेंदूच्या पोषणासाठी आहारात घ्या ‘हे’ ५ पदार्थ, तज्ज्ञांनी सांगितले फायदे…