-
मराठी अभिनेत्री पूजा बिरारीने (Pooja Birari) नुकतीच लग्नानंतरची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली.
-
२ डिसेंबर २०२५ रोजी पूजाने अभिनेता व निर्माता सोहम बांदेकरबरोबर (Soham Bandekar) लग्नाची गाठ बांधली.
-
लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीसाठी पूजाने अत्यंत सुंदर मराठमोळा लूक केला होता.
-
पूजाने पिवळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा आकर्षक डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपरिक नऊवारी लूकवर पूजाने केलेल्या साजेशा पारंपरिक दागिन्यांच्या साजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
पूजाच्या या मनमोहक फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
पूजा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha TV Serial) या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)