-
झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navaryachi Bayko) ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती.
-
२०१६ ते २०२१ अशी तब्बल साडेचार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
-
या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते-केळकरने (Anita Date Kelkar) ‘राधिका’ ही मुख्य भूमिका साकारून घराघरात ओळख मिळवली.
-
सध्या अनिताच्या एका हटके साडी फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोशूटसाठी अनिताने मोती रंगाची सुंदर साडी आणि त्यावर आकर्षक प्रिंटेड ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अनिताच्या या साधेपणातही खुलून दिसणाऱ्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अनिताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनिता दाते/इन्स्टाग्राम)
रुपाली ठोंबरे पाटील यांच्या टीकेला विद्यानंद बापटांचे प्रत्युत्तर! म्हणाले, “हा तर तार्किक खोटारडेपणा, लोकमान्य टिळकही…”