-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अभिनेत्री साक्षी गांधी मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.
-
साक्षीने सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले असून, त्यात ती निसर्गाच्या सान्निध्यात पोज देताना दिसत आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने सुंदर आणि पारंपरिक अशा कलमकारी पॅटर्नची साडी परिधान केली आहे, ज्यावर निळा, लाल आणि पिवळ्या रंगात हत्ती आणि इतर नक्षीकाम आहे.
-
साडीबरोबर तिने मॅचिंग बॅकलेस स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे, ज्यामुळे तिचा हा साडीतील लूक अधिकच स्टायलिश आणि मॉडर्न वाटत आहे.
-
तिच्या या पारंपरिक लूकला ऑक्सीडाइज्ड दागिन्यांनी परिपूर्ण केले असून, तिने कानात झुमके, गळ्यात चोकर नेकलेस आणि हातात बांगड्या व अंगठी घातली आहे.
-
साक्षीने तिचे कुरळे केस मोकळे सोडले असून, या फोटोशूटमध्ये ती निसर्गाचा आनंद घेताना आणि वेगळ्या पोज देत लाजताना दिसत आहे.
-
साक्षीने या सुंदर फोटोंना ‘Lajja se mare re ye jiya..!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या साध्या आणि सुंदर लूकवर चाहते घायाळ झाले असून, तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
LIVE: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज काय युक्तिवाद झाला? वाचा लाइव्ह अपडेट्स