-
भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन काल (२८ ऑगस्ट) राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेदेखील हा सण अत्यंत पारंपरिक व घरगुती वातावरणात साजरा केला आहे.
-
या विशेष प्रसंगी रिंकूने तिचा सख्खा लहान भाऊ सिद्धार्थ राजगुरू याला प्रेमाने आणि औक्षण करून रेशमी राखी बांधली.
-
या सणासाठी रिंकूने अत्यंत पारंपरिक आणि आकर्षक असा क्रीम रंगाचा सुंदर पंजाबी ड्रेस परिधान केला होता, ज्याच्या बॉर्डरवर सुरेख डिझाईन दिसत आहे.
-
मोकळे सोडलेले केस, कपाळावर छोटी नाजूक टिकली आणि चेहऱ्यावरील हास्य यामुळे तिचा साधा पण अतिशय प्रसन्न लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
या कौटुंबिक सोहळ्यात त्यांच्या पाळीव श्वानाचाही सहभाग पाहायला मिळाला असून, रिंकूने त्याच्यासोबतचेही काही गोड क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत.
-
भावा-बहिणीच्या या गोड आणि कौटुंबिक फोटोंवर तिच्या चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ