-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगांवकर ‘शर्वरी’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तिने नुकतेच तिचे काही नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
तिने परिधान केलेल्या या जांभळ्या रंगाच्या रेशमी पैठणी साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
तिच्या नाकातील मोत्याची नाजूक नथ आणि कानातील सुंदर कर्णफुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
गळ्यात घातलेला नाजूक हार आणि हातातील सोन्याच्या बांगड्यांमुळे तिचा हा अवतार उठून दिसत आहे.
-
हलका मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली आणि नेटकी हेअरस्टाईल करून तिने हा मराठमोळा लूक पूर्ण केला आहे.
-
हिरवळीच्या पार्श्वभूमीवर काढलेले हे फोटो शेअर करत तिने ‘पारिजात…’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
‘एमपीएससी’ पेपरफुटी: तत्कालीन प्रभारी अध्यक्ष अभय वाघ संशयाच्या भोवऱ्यात, कार्यकाळातील निर्णय प्रक्रियेची चौकशी होणार?