-
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा भगरेने (Anaghaa Bhagare) नुकतीच कोल्हापूर येथील प्रसिद्ध श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन घेतले.
-
कोल्हापूरचे श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे आणि पूर्ण शक्तीपीठ मानले जाते.
-
हे मंदिर धार्मिक, ऐतिहासिक तसेच वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे.
-
अनघाने या दर्शनासाठी अत्यंत साधा कुर्ती-जीन्सचा लूक निवडला होता. मंदिराच्या शांत आणि भक्तीमय वातावरणात तिने देवीचे दर्शन घेतले.
-
या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनघाने लिहिले, “शक्तीपीठ… श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई माते की जय!”
-
अनघाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी पसंतीचा वर्षाव केला असून “जय अंबाबाई” अशा कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.
-
आपल्या व्यस्त शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ काढून विविध तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि तिथले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करणे अनघाला खूप आवडते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
दशदिशांनी लक्ष्मी धावून येणार! ३० वर्षांनतर शनी महाराज होणार मार्गी, २०२७पर्यंत ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; बँक बॅलन्स वाढणार कोटींमध्ये