-
छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री गिरिजा प्रभू नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकत असते.
-
गिरिजाने नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गिरिजाने परिधान केलेली ऑफ-व्हाईट रंगाची भरजरी साडी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या साडीवर तिने हेवी वर्क आणि डिझाईन असलेला लाल रंगाचा मॅचिंग ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
गळ्यात घातलेला बारीक मोत्यांचा आणि हिरव्या खड्यांचा सुंदर चोकर हार तिच्या पारंपरिक सौंदर्यात भर घालत आहे.
-
हे फोटो पोस्ट करत गिरीजाने ‘Red . White. Grace. That’s the vibe.’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून चाहते तिच्या या ग्लॅमरस पारंपरिक लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
‘CJP आंदोलकाला नोटीस पाठवायची तुमची हिंमत कशी झाली?’ सरन्यायाधीश सूर्य कांत का संतापले?