-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले असून, या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (Kashmira Kulkarni) महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच कश्मिराने एका खास मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कश्मिराने निळ्या रंगाची नऊवारी पैठणी साडी आणि त्यावर साजेसा लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या नऊवारी लूकवर कश्मिराने घातलेले पारंपरिक दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
हे फोटो शेअर करत कश्मिराने “साज मराठी, अंदाज रॉयल” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
याआधी कश्मिराने ‘काव्यांजली – सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali TV Serial) या लोकप्रिय मालिकेतही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कश्मिरा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे