-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित संगीतमय खेळ-कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ आज, २९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने खास हजेरी लावली आहे.
-
सेटवरील आपल्या या खास उपस्थिीतीचे आकर्षक फोटो जुईने तिच्या सोशल मीडियावर प्रेक्षकांसाठी शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जुईने परिधान केलेला निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड प्लाझो आणि क्रॉप टॉप सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
-
या आऊटफिटवर तिने गळ्यात घातलेली बहुपदरी पांढऱ्या मोत्यांची माळ तिच्या लूकला एक रॉयल आणि आकर्षक टच देत आहे.
-
केसांना मॅचिंग निळ्या रंगाचा बँड/रिबन लावून केलेली सुंदर हेअरस्टाईल तिच्या या लूकवर अगदी उठून दिसत आहे.
-
जुई गडकरीचा हा भन्नाट आणि सुंदर लूक पाहून तिच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले सायलेंट हार्ट अटॅकचे ‘हे’ ५ संकेत; ५ पैकी एका प्रकरणात लक्षणंच नाहीत! छातीत न दुखताही येऊ शकतो अटॅक