-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकरच्या (Shivani Mundhekar) नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने गुलाबी रंगाची प्लेन साडी नेसली असून त्यावर हिरव्या रंगाचा सुंदर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
गुलाबी साडीतील या लूकवर शिवानीने नाजूक, मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
या साडीवर शिवानीने हलका मेकअप आणि अतिशय सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
-
शिवानीचा हा लूक पाहून चाहत्यांना संजू राठोडचं ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ हे लोकप्रिय गाणं आठवत आहे.
-
शिवानीने स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेत ‘रमा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
या मालिकेतील दोन वेण्यांमधील तिचे साधे, सोज्वळ आणि समंजस गृहिणीचे रूप प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस उतरले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे