-
स्टार प्रवाह वाहिनीवर १० ऑगस्टपासून ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ (Aamchya Ladkya Naik Bai) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
या मालिकेत लाडकी मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) ‘दर्शना लाड’ या खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.
-
‘दर्शना लाड’ उर्फ ‘लाडबाई’ ही नावाप्रमाणेच अत्यंत गोड बोलणारी, पण तितकीच धूर्त आणि कपटी स्वभावाची आहे.
-
या मालिकेच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
अमृताने नुकतेच तिच्या साडीतील लूकचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने हिरव्या रंगाची प्लेन साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
याआधी अमृताने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ