-
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय, गुणवंत आणि सदाबहार जोडी म्हणून ओळखली जाते.
-
नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
-
नुकतेच या जोडीने एक खास रोमँटिक फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी सुंदर केशरी रंगाची साडी नेसली आहे तर, अविनाश शर्ट-पँटमधील स्मार्ट लूकमध्ये दिसत आहेत.
-
ऐश्वर्या यांनी केशरी साडीतील लूकवर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
‘गंध निशिगंधाचा’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ऐश्वर्या आणि अविनाश यांची पहिली भेट झाली होती.
-
३ डिसेंबर १९९५ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”