-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सानिका बनारसवाले (Sanika Banaraswale) लवकरच ‘मृत्यूचक्र’ (Mrutyuchakra Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या चित्रपटात सानिका मृत्यूचक्राच्या विळख्यात अडकलेली एक गूढ व्यक्ती म्हणजेच “डॉ. चित्रा” ही भूमिका साकारताना दिसेल.
-
डॉ. चित्राच्या चेहऱ्यामागे एक असं रहस्य दडलंय, जे या ‘मृत्यूचक्रा’च्या खेळाला अनपेक्षित वळण देणार आहे.
-
चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच सानिकाने एका खास बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी तिने आकर्षक पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, तिच्या या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
सानिकाने ‘स्टार प्रवाह’वरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत ‘नयना खरे’ची व्यक्तिरेखा साकारून घराघरांत लोकप्रियता मिळवली होती.
-
याशिवाय सानिकाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका बनारसावले/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ