-
घाम, डिओडरंट, तेल किंवा अन्नाचे डाग यामुळे कपड्यांवर (विशेषतः पांढऱ्या कपड्यांवर) पिवळे डाग पडतात.
-
हे डाग घालवण्यासाठी महागड्या केमिकलची गरज नाही. घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही हे डाग सहज काढू शकता..
-
बेकिंग सोडा पेस्ट (Baking Soda Paste) : बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा, हलक्या हाताने चोळा आणि ३० मिनिटांसाठी राहू द्या. नंतर कपडे नेहमीप्रमाणे धुवा. यामुळे घामाचे डाग आणि दुर्गंधी दोन्ही दूर होते.
-
व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) : व्हाईट व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. कपड्याचा डाग पडलेला भाग या पाण्यात सुमारे ३० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर धुवा. व्हिनेगरमुळे कपड्यांवरील पिवळेपणा सहज निघून जाण्यास मदत होते.
-
लिंबाचा रस (Lemon Juice) : फिकट रंगाच्या किंवा पांढऱ्या कपड्यांवरील डागावर ताज्या लिंबाचा रस लावा. त्यानंतर ते कपडे थोडा वेळ सौम्य उन्हात ठेवा आणि नंतर धुवून घ्या. लिंबामधील नैसर्गिक गुणधर्मांमुळे कपड्यांना पुन्हा चमक येते.
-
धुण्यापूर्वी कपडे पाण्यात भिजवणे (Pre-Soak) : कोमट पाण्यात थोडे डिटर्जंट टाका आणि डाग पडलेले कपडे ३० ते ६० मिनिटे भिजत ठेवा.
-
धुण्यापूर्वी डागाचा भाग हलक्या हाताने चोळा आणि मग मशीन किंवा हाताने नेहमीप्रमाणे धुवा.
-
हायड्रोजन पेरोक्साइड (Hydrogen Peroxide) पांढऱ्या कपड्यांसाठी हायड्रोजन पेरोक्साइड आणि डिशवॉशिंग लिक्विड (भांडी धुण्याचे लिक्विड) एकत्र करून डागावर लावा. थोड्या वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
“७ वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुण्यात आलेल्यांनी आम्हाला गणेशोत्सव शिकवू नये”, विद्यानंद बापटांवर रुपाली ठोंबरे पाटील यांची टीका