-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चांगलीच गाजत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) ‘कमळी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
आपल्या हक्कांसाठी, स्वप्नांसाठी आणि मातीशी असलेल्या नात्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या एका स्वाभिमानी मुलीची कथा विजयाने ‘कमळी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडली आहे.
-
नुकतीच विजयाने झी मराठीच्या ‘गोविंदा आला रे’ (Govinda Aala Re) या खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
‘गोविंदा आला रे’ हा गोकुळाष्टमी व कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला एक विशेष मनोरंजक कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमाच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत विजयाने त्याला ‘बुरगुंडा होईल बया गं’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या