-
श्रावण महिन्यात अनेक नवविवाहिता मंगळागौरीचे व्रत अत्यंत श्रद्धा आणि उत्साहाने साजरे करताना दिसून येतात.
-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिनेदेखील मंगळागौरीचे तिचे पहिले व्रत नुकतेच थाटामाटात साजरे केले आहे.
-
या विशेष पूजेसाठी रेवतीने पारंपरिक जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर लाल रंगाचा शालू परिधान करून अत्यंत देखणा लूक केला होता.
-
साडीच्या शोभेल असे सोन्याचे पारंपरिक दागिने, गळ्यात चोकर व मोत्यांची नथ यांमुळे तिच्या या खास लूकची शोभा आणखी वाढली होती.
-
हातात हिरवा चुडा, दोन्ही बाजूंना पाटल्या-बांगड्या आणि बोटात नाजूक अंगठी घालून, तिने आपला हा पारंपरिक साज परिपूर्ण केला होता.
-
केसांचा अंबाडा बांधून, त्यावर पिवळ्या फुलांची वेणी माळल्यामुळे रेवतीच्या सौंदर्याला एक वेगळाच उठाव मिळाला होता.
-
मंगळागौरीच्या पूजेदरम्यान आणि फोटो काढताना तिच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न आणि आनंदी भाव स्पष्टपणे दिसून येत होता.
-
सोशल मीडियावर रेवतीच्या या मंगळागौरीच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवती लेले/इन्स्टाग्राम)
काकू तुमचा नादच खुळा…. ‘देखा है पहली बार’ गाण्यावर काकूंनी केला घातला राडा; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक