-
काजल काटे (Kajal Kate) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
अभिनयातील सहजता आणि उत्तम विनोदी टाईमिंगमुळे काजल आज घराघरात पोहोचली आहे.
-
झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
या मालिकेत काजलने साकारलेली ‘शेफाली’ ही बिनधास्त आणि बडबड्या मुलीची भूमिका विशेष गाजली.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काजलने नुकतेच तिचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये काजलने लाल रंगाची कॉटन साडी परिधान केली असून तिचा लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना काजलने ‘Keep It Simple, Keep It Classy’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजल काटे/इन्स्टाग्राम)
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड! मूल्यांकनात गडबड; १३५ गुणांचे झाले १०१ आणि नंतर ६८…