-
Apple Cider Vinegar For Weight Loss: ॲपल सायडर व्हिनेगरचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवण्यास नक्कीच मदत होते.
-
यातील ‘ॲसिटिक ॲसिड’ तुमचे पोट जास्त वेळ भरलेले ठेवते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
-
यामुळे शरीराची चयापचय (Metabolism) क्रिया जलद होऊन फॅट वेगाने बर्न होण्यास मदत होते.
-
जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, ज्यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.
-
दररोज सकाळी १ ग्लास कोमट पाण्यात १ ते २ चमचे (5-10 ml) ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून घ्या.
-
ॲपल सायडर व्हिनेगरची चव आवडत नसल्यास त्यात थोडं मध टाकू शकता.
-
सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणाच्या १५ ते २० मिनिटे आधी पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.
-
केवळ व्हिनेगर प्यायल्याने वजन कमी होत नाही; त्यासोबत योग्य आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोटाचा काही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
-
(हेही पाहा : कपड्यांवरील पिवळे डाग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय)