-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ (Anandi TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
वेधक कथानक आणि प्रभावी अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकर (Jaee Khandekar) ‘आनंदी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
एका अपघातात दृष्टी गमावूनही जीवनाकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहणाऱ्या एका तरुणीची ही कथा आहे. दृष्टी नसली, तरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अगदी सुंदरपणे अनुभवते.
-
जाईने नुकतेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘वस्त्रवलय’ या ब्रँडसाठी एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये जाई पेस्टल केशरी आणि गुलाबी रंगाच्या सिल्क अनारकली ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
यंदा गणेशोत्सवाची सुरुवात १४ सप्टेंबरपासून होत असून २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जाई खांडेकर/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ