-
सकाळी उठल्यावर चेहरा सुजणे ही एक सामान्य समस्या असली तरी नियमितपणे असा त्रास होणे जीवनशैलीतील बिघाड किंवा आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकते.
-
चेहऱ्यावरील सुजेचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करण्यासाठी त्वचातज्ज्ञ (Dermatologist) किंवा फिजिशियनचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
-
गुरुग्राम येथील ‘बॉडीक्राफ्ट क्लिनिक्स’च्या मेडिकल डायरेक्टर डॉ. मिक्की सिंग यांनी सकाळी चेहरा सुजण्याची ५ प्रमुख कारणे आणि उपाय सांगितले आहेत.
-
रात्री शरीरातील द्रव साचणे
सलग अनेक तास पाठीवर अथवा सरळ चेहऱ्यात पाणी साचून सूज येते; यासाठी डोक्याखाली उशी घ्यावी आणि रात्री खारट पदार्थ खाणे टाळावे. -
ॲलर्जी किंवा त्वचेची जळजळ
धूळ, पाळीव प्राणी किंवा रात्री वापरलेल्या कॉस्मॅटिक्समुळे ॲलर्जी होऊन डोळ्यांभोवती सूज येते; यासाठी ॲलर्जी-फ्री उत्पादने वापरावीत. -
मद्यपान आणि मिठाचे जास्त सेवन
दारू आणि जास्त मीठ डिहायड्रेशन घडवून आणतात; यामुळे चेहऱ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी साचून सकाळी सूज दिसते. -
अपुरी झोप आणि स्लीप ॲप्निया
पुरेशी झोप न मिळाल्यास स्ट्रेस संप्रेरके वाढून चेहऱ्यावर सूज येते, तसेच स्लीप ॲप्नियासारखे आजारही याला कारणीभूत ठरू शकतात. -
वैद्यकीय समस्या
हायपोथायरॉईडिझम, सायनस किंवा किडनीच्या समस्यांमुळे सकाळी चेहरा सुजू शकतो; असा त्रास वारंवार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ